जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
साधीच हि कहाणी सोपेच नाव होते
कुठलेही पान उलटा नवखेच भाव होते
कांही मिळून गेली कांही जुळून आली
नातीच ना ती सुखाचे सारे पडावं होते
वस्तीत या सुखाच्या कांही भरावं होते
कोठे उतार नव्हता सारे चढाव होते
थकलोच शोधताना गर्दीत माणसांच्या
माणूस कुठे नव्हता सगळे जमाव होते
व्यवहार भावनांचे दिसलें घरोघरी त्या
कोठे प्रभाव होते तर कोठे उठाव होते
मंदिर पहिले मी आरास भव्य दिसली
श्रद्धेविना पुजारी अन नुसते ठराव होते
जे भेटले कुणी मज भलतेच साव होते
कुणी रंक राव कोणी फसवे बनाव होते
कहाणीत वाचले ते परिचीत वाटले पण
कळले अखेर मजला ते माझेच गाव होते
अरविंद
6/7/21