समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन; आमदार दिपक केसरकरांची उपस्थिती…
सावंतवाडी
राज्याचे माजी आरोग्य मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांची ९८ वी जयंती त्यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहून साजरी करण्यात आली. यावेळी जमलेल्या मान्यवरांनी भाईंच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत, आमदार दीपक केसरकर, अमोल सावंत,सी एल नाईक, डॉ. दिनेश नागवेकर, व्हि बी नाईक, अशोक दळवी,सुधीर मल्हार, सौ.विभावरी सुकी, संदीप सुकी, चंद्रकांत राणे, बाब्या म्हापसेकर, मुख्याध्यापक श्री धोंड, शैलेश नाईक व मान्यवर उपस्थित होते.