You are currently viewing नाती

नाती

नाती

आयुष्यात नाती पुष्कळ असतात,
काही मनातली, काही क्षणातली..

काही रक्ताची तर काही मानलेली,
काही मोलाची तर काही निभावलेली,

कोणी नजरेत राहतात, तर
कोणी आठवणी बनून जातात..

पण जी अनमोल असतात,
ती केवळ हृदयात घर करतात..

हृदयात राहणाऱ्या माणसांना,
ओढ असते, काही क्षणांच्या भेटीची.

त्या क्षणिक भेटीत देखील,
शब्दांपेक्षा त्यांचे डोळेच बोलतात.

आनंदाश्रून्नी भरलेले डोळे तेव्हा,
आपसूकच गालावर ओघळतात…

नाती अशीच असतात,,,
अबोल,अनमोल,निस्वार्थी…
शिंपल्यातल्या मोत्यांसारखी…!!

(दीपी)

दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा