You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघ अधिकारी-कर्मचारी आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आरोग्य सहाय्यक बाबाजी अडूळडकर यांची निवड

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ अधिकारी-कर्मचारी आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आरोग्य सहाय्यक बाबाजी अडूळडकर यांची निवड

कुडाळ

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ अधिकारी-कर्मचारी आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आरोग्य सहाय्यक बाबाजी अडूळडकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली. जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी वर्गाला न्याय देण्यासाठी व त्यांचे हक्कासाठी लढा देण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या वतीने जिल्ह्यामध्ये सक्षम काम करून समाजातील विद्यार्थी वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सहकार्य करेल व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येईल असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबाजी अडुळकर यांनी व्यक्त केला आहे.निवड पत्र देताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष अमोल जंगले, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. रामचंद्र काळे, कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष दिपक खरात, मालवण तालुका अध्यक्ष मंगेश झोरे, आरोग्य सेवक सखाराम गुरखे, संभाजी खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा