You are currently viewing ७ रोजी कासार्डे तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा

७ रोजी कासार्डे तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा

तळेरे:- प्रतिनिधी

कासार्डे तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा सोमवार दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 7 फेब्रुवारी२०२२ रोजी सकाळी ७.३० ते ८.३०वा कलश मिरवणूक ,स.८.३०ते ११.३० वा. पुण्याहवाचन,वास्तूहोम, अभिषेक, कलशारोहन, सकाळी ११.३०ते १२.३० वा श्री सत्यनारायण महापूजा, दू. १२.३०ते दु.१.३०वा. महाआरती व तीर्थप्रसाद, ढोल पथक (श्री गांगेश्वर नवतरुण मित्र मंडळ, कुणकवण), दु. १.३० ते३.००वा. महाप्रसाद, सायं.४.००ते६. वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ६ ते ८ वाजता स्थानिक भजन, रात्री ८ ते ९ वाजता विशेष सत्कार, रात्री९.३० नंतर आमनेसामने डबलबारी भजनाचा जंगी सामना- बुवा श्री गणेश जांभळे (श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ मुंबई.,गाव- केळवली (राजापूर,) गुरुवर्य बुवा- श्री प्रमोद हर्याण, विरुद्ध बुवा श्री. संतोष जोईल श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ गाव- खुडी ता.देवगड गुरुवर्य बुवा-श्री श्रीधर मुणगेकर वरील सर्व कार्यक्रमाला भाविक भक्तांनी व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री आवळेश्वर ग्रामस्थ व मुंबई मंडळ कासार्डे तांबळवाडी यांनी केले आहे.

आवळेश्वर मंदीर कासार्डे तांबळवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा