जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांची काव्यरचना
पुरुषाला बाळंतपणाच्या
नाही सोसाव्या लागत कळा
तरी जबाबदारी टाळून
बाप होतच नाही मोकळा
अविरत उर्जा असणारी
बाप प्रपंच रथाची गती
कुटूंबियांसाठी झटणारा
एक सशक्त खंबीर व्यक्ती
संकटकाळी असतो बाप
कुटूंबासाठी आधार खरा
कोठून उगम पावतो हा
अव्याहत वाहणारा झरा
लाड नि कौतूक अपत्याचे
बापाला करावेसे वाटते
वाढदिवसासाठीचा केक
घरी घेऊन जावे वाटते
नेमके अशावेळी कामाच्या
बाॅसकडून येती सुचना
बाप वेळेत न आल्यामुळे
आनंद कसा मावळतोना
बापाच्या अपराधी मनास
उगाच वाटे घडला गुन्हा
घरच्यांना आश्वासीत करी
घडणार नाही असे पुन्हा
बापाच्या काळजाला काळजी
सारे काही व्हावे सुरळीत
नवनव्या कल्पना सांगून
घर ठेवी सदा आनंदीत
बापालाही समजून घ्याव
तो घराच्या पायातील शीळा
खचू न द्यावे तयाचे मन
आईच्या कुंकवाचा तो टिळा.
चंद्रशेखर द.धर्माधिकारी
वारजे,पुणे©️