सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कोषागार कार्यालयात कोकण विभागाचे सह संचालक अनुदीप दिघे आणि जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत यांच्या उपस्थितीत 58 वा कोषागार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये जिल्हा सामान्या रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी वल्लरी गावडे, स्थानिक लेखा निधीचे सहाय्यक संचालक बाळासाहेब पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
सह संचालक श्री. दिघे म्हणाले, कोषागार दिनानिमित्त आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा स्त्युत्य उपक्रम आहे. कोविडच्या काळात आरोग्य शिबीर व रक्तदार शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केल्याने एक वेगळा आदर्श जिल्हा कोषागाराने दिला आहे.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. खोत यांनी यावेळी कोषागार दिनाचे महत्व व प्रवासाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा कोषागारातील 19 अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले. तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली.