जिल्हा प्रवक्ता, भाजपा युवा मोर्चा दादा साईल यांचा वैभव नाईक यांना टोला….
कुडाळ
रुग्णालयाची अवस्था आणि व्यवस्था पहता कोणीही सर्व सामान्य माणूस तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी अपु-या व्यवस्थेत रुग्णांना मनोभावे सेवा देत आहेत. त्या बद्दल कुणाचेही दुमत नाही. परंतु त्याठिकाणची व्यवस्था पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासन प अपुरे पडले आहे हे सत्य आमदार वैभव नाईक यांना स्विकारावेच लागेल. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील कार्यक्षम डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी यांना रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी पुरेशा सुविधा आणि सोई न देता त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार करत आहेत. उलट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हाअध्यक्ष राजन तेली , माजी आमदार प्रमोद जठार, आमदार नितेश राणे व त्यांचे सहकारी यांनी सर्वप्रथम मनोभावे सेवा करणा-या आरोग्य कर्मचा-यांची विचारपुस करुन त्यांना आवश्यक PPE KIT, इंजेक्शन उपलब्ध करुन दिली होती. आमदार नितेश राणेंसारख्या संपुर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख असलेल्या कर्तुत्ववान नेतृत्वाला प्रसिद्धीची कोणतीही आवश्यकता नाही. उलट न केलेल्या कामांची फुकटचे श्रेय घेवून फक्त पत्रकबाजी करण्यासाठी आमदार वैभव नाईक संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हयात प्रसिद्ध आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालया व्यवस्थापनेतील त्रृती दाखवून देणे ही आमदार वैभव नाईकांना बदनामी वाटत असेल तर त्यापेक्षा मोठे र्दुदैव नाही. पडवे येथे राणे साहेबांनी उभारलेले लाईफ टाईम हॉस्पीटल हे खाजगी हॉस्पीटल असून त्याठिकाणी राणेसाहेबांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच 100 बेडचे कोव्हीड रुग्णालय तयार असल्याचे जाहिर केले होते. आम्ही ही वेळोवेळा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कोरोना बाधित रुग्ण आणि संस्थात्मक विलगीकरण करणेच्या सोयीसाठी पडवे येथील हॉस्पीटल मध्ये प्रशासनाच्या वतीने सोय करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावेळी पालकमंत्र्यांनी याकडे जाणून बुजुन र्दुलक्ष केले होते. आज जेव्हा राणेसाहेबांनीं पडवे येथील हॉस्पीटल मध्ये खाजगी रित्या कोव्हीड हॉस्पीटल सुरु केले तेव्हा वैभव नाईकांना यात राजकारण व व्यवसाय दिसून लागला आहे. वैभव नाईकांनी अगोदर अशाप्रकारचे हॉस्पीटल उभे करुन दाखवून मगच वल्गना कराव्यात. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पीटल मध्ये खाजगी कोव्हीड हॉस्पीटल सुरु झाल्यामुळे ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे,त्यांना त्याठिकाणी चांगल सोय उपलब्ध होवू शकेल व त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य लोकांना सेवा देणे शक्य होईल. आजही जिल्हा सामान्यरुग्णालयामध्ये कोरोना टेस्टचे निदान व्हायला किमान 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार करायला अधिक वेळ लागतो आहे.त्यामुळे ज्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर गावी जायचे आहे किंवा जे बाहेरुन जिल्ह्यात आले असतील त्यांना कोरोना टेस्ट करुन घ्यायला लाईफ टाईम हॉस्पीटलच्या RTPCR टेस्ट लॅबमुळे चांगली सोय (सशुल्क) उपलब्ध झाली आहे.