*आमदार नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाने शरण येण्यास दिली होती १० दिवसांची मुदत*
*शरणांगतीचा लेखी अर्ज करून कोर्टासमोर शरण न आल्याने नियमित जामीन अर्ज फेटाळला*
*संतोष परब हल्ला प्रकरणी आम.नितेश राणे संशयित आरोपी.*
*नितेश राणेंचे सेक्रेटरी राकेश परब यांना मिळाली 4 दिवसांची पोलीस कोठडी*
*मुख्य संशयित राकेश परब यांच्या फोनवर नितेश राणेंचे संभाषण झाले होते, त्यामुळे ते वापरत असलेले 7 मोबाईल ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे*
*नावाजलेले मुंबईतील वकील सतीश मानेशिंदे यांनी जिल्हा न्यायालयात मांडली नितेश राणेंची बाजू, कुडाळचे वकील संग्राम देसाई होते त्यांच्यासोबत*
*सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने जिल्हा न्यायालयात शरण येत रीतसर नियमित जामिनासाठी अर्ज करण्यासाठी दिली होती 6 फेब्रुवारी पर्यंत 10 दिवसांची मुदत*
*आम.नितेश राणेंच्या अर्जावर बाजू मांडताना कोर्टात हजर असणारे व तोंडी कोर्टासमोर शरण आल्याचे सांगणारे नितेश राणे मधल्या वेळेत कोर्टाच्या बाहेर जेवणासाठी गेल्याने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी घेतला आक्षेप*
*एकदा कोर्टात शरण आलेले आरोपी कोर्टाच्या परवानगीशिवाय कोर्टाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत असा केला युक्तिवाद*
*न्यायालयीन कामकाज पूर्ण न होताच नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत गाडीतून निघाले असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडविली*
*निलेश राणेंनी आणि आनंद शिरवलकर सहित राणे समर्थकांनी पोलिसांना विचारला जाब*
*”तुम्ही कोणाच्या आदेशाने गाडी अडवता? कशासाठी आम्हाला थांबवता? ओपन कोर्टात आदेश झालेला आहे, तुम्हाला कायदा माहिती नसेल तर शिकून घ्या” असे पोलिसांना ठणकावत माजी खासदार निलेश राणेंनी विचारला जाब*
*आक्रमक झालेल्या निलेश राणे आणि आनंद शिरवलकर यांनी पोलिसांना गाडी सोडण्यास पाडले भाग*
*मुंबई हायकोर्टाने आमदार राणेंचे नावाजलेले वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाचा आदेश सांगताना असे म्हटले की, “आपण जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करताना कोर्टासमोर आमदार नितेश राणे यांचा शरण येत असल्याचा लेखी अर्ज दाखल न केल्याने न्यायालयाने नियमित जमीन अर्ज नामंजूर केला.”*
*सुप्रीम कोर्टाने 6 फेब्रुवारी पर्यंत अटक न करण्यास व नियमित अर्ज दाखल करण्यास मदत दिली असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. असे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.*
*नितेश राणे हे कोर्टाच्या आवारातून घरी जाण्यास निघाले*
*जिल्हा न्यायालयात आम नितेश राणे यांच्या अर्जावर सुनावणी व हायहोलटेज ड्रामा सुरू असताना कोर्टाबाहेर निलेश राणेंचे समर्थक संजू परब, केतन आजगावकर, रणजित देसाई, आनंद शिरवलकर आदी अनेकजण आक्रमकपणे भांडत होते, परंतु भाजपच्या जिल्हाध्यक्ष राजन तेली किंवा इतर मूळ भाजपाचे कोणीही नेते तिथे फिरवल्याचे दिसले नाहीत.*