You are currently viewing चिंच बनात

चिंच बनात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना*

*चिंच बनात*

चिंच बनात,गर्द राईत
तुझी माझी भेट गं
भिडता नजर,माझ्या डोळा
पहातो तुझी ऐट गं

स्पर्श करता,लक्ष चांदण्या
चेहरा तुझा चांद गं
स्पर्श कोमल,उमले कमल
दरवळे गंध सारा सांद गं

तू निस्पंद मी निस्पंद
तूच वाटे बुलंद गं
गंध दरवळे,काही वदले
कोण उधळे मकरंद गं

फांदी हलते,काही बोलते
तुला देई झूल गं
तूच बोलता,मान हलते
माझ्याशी बोले डूल गं

बोलता बोलता,क्षणही गेले
अशीच झाली दुपार गं
नाही कळले,चिंच बनाला
किती सरले द्वापार गं

घेऊनी चेतना,लढतो सीमेवरी
शत्रू धरी तोंडी घास गं
माझ्या पराक्रमी शौर्याला
येतो तुझ्या प्रेमाचा वास गं

सांद : मागील अंगण,द्वापार : तिसरे युग)

© मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा