रोहण इंगळे हे कनगवली गाव , तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथील एक पारंपरिक शेतकरी आहेत. रोहण हे एक सुशिक्षित शेतकरी आहेत आणि पारंपरिक पद्धतीने भात शेती करतात . दरवर्षी रोहण हे सुवर्णा भात लागवड करत होते परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नवते . गेल्या वर्षी रोहण इंगळे हे रिलायन्स फाउंडेशन व कृषि विज्ञान केंद्र , लांजा यांनी आयोजित केलेल्या भात लागवडीच्या कार्यक्रमध्ये सहभागी झाले होते तेव्हा त्यांना बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या रत्नागिरी 08 व रत्नागिरी 7 या वानाबद्दल माहिती मिळाली. .
खरीप हंगामामध्ये रत्नागिरी 7 हे अर्ध्या एकर मध्ये लावण्यात आले व रत्नागिरी 8 हे अर्ध्या एकर मध्ये लवणयात आले लागवड करताना झिग झाग म्हणजेच Z पद्धतीने करण्यात आली.. रत्नागिरी 7 बियान्याचा कालावधी 122 ते 125 दिवस व रत्नागिरी 8 बियाणाच्या लागवड कालावधी .135-138 दिवसांचा आहे. रोहण हे 2020 मध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून रिलायन्स फाउंडेशन व बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ प्रस्तुत ग्रामीण कृषि सल्ला व्हाटसप्प व ध्वनी संदेशमार्फत मिळत आहेत , यामध्ये हवामानावर आधारित कृषि सल्याचा वापर करून भात शेतीमध्ये खत व्यवस्थापन , कीड व रोग व्यवस्थापन केले. त्यामुळे त्यांना कीड व रोग यापासून त्यांना बचाव करता आला व युरियाचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आला . जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक 18004198800 वर फोन करून देखील मार्गदर्शन घेतले आहे .
रत्नागिरी 7 बियाणे 8 किलो अर्ध्या एकरला व रत्नागिरी 8 बियाणे 8 किलो अर्ध्या एकरला वापरण्यात आले. रत्नागिरी 7 हे 20 गुंठ्यामध्ये 9 क्विंटल व रत्नागिरी 8 हे 20 गुंठयामध्ये 10 क्विंटल उत्पन्न भेटले . साधारणतः बियनांचा खर्च व मजुरीचा खर्च पकडून इनपुट खर्च 10000 रुपये आला . रत्नागिरी 7 व 8 भाताला प्रती क्विंटल 1९४0 रुपये दर मिळाला . साधारणतः सर्व इनपुट खर्च काढून 25000 रुपये उत्पन्न डिसेंबर २०२१ मध्ये मिळाले .
रोहण इंगळे यांना रिलायन्स फाउंडेशन कडून हवामानावर आधारित कृषि सल्ला , रिलायन्स फौंडेशनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील व कृषि विज्ञान केंद्र लांजा येथील तज्ञ शास्त्रज्ञानकडून मार्गदर्शन घेऊन अपेक्षित उत्पन्न घेतले व रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानले. तसेच सर्व शेतकर्यांनी या महितीचा उपयोग करून शेतीत सुधारना करण्याचे आव्हाहन रोहण इंगळे यांनी केले आहे .