You are currently viewing मराठा समाजा कुडाळ तर्फे ढ मंडळी ( बिलिमारो ) संघाचं जल्लोषात स्वागत

मराठा समाजा कुडाळ तर्फे ढ मंडळी ( बिलिमारो ) संघाचं जल्लोषात स्वागत

मराठा समाजा तर्फे स्वागतासाठी श्री धिरज परब, निलेश परब, केदार राऊळ, वैभव जाधव निलेश परब, बंड्या सावंत यांची उपस्थिती

*कुडाळ वासियांच्या शिरपेचा मध्ये अजून एक मनाच तुरा**पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 वर्ष ८ वे यात कुडाळ मधील *ढ** मंडळी चा महाअंतिम फेरीत *बिलिमारो** या एकांकिकेने *पहिला क्रमांक**मिळवला
प्राथमिक फेरीमध्ये एकूण 108 संघामधून 25 संघांची महा अंतिम फेरीसाठी निवड झाली. संपूर्ण राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये शेवटचा 25 संघांमध्ये ढ मंडळी यांची बिलिमारो या एकांकिकेचा प्रथम क्रमांक आला. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आला. ढ मंडळी या संघामध्ये एकूण 25 कलाकार काम करत आहेत वैयक्तिक व सांघिक बरीच बक्षिसे पटकावली

1) बिलिमारो प्रथम क्रमांक (संघ एक लाख रुपये रोख व पारितोषिक)
२) तृतीय क्रमांक सर्वोत्कृष्ट अभिनेता विठ्ठल तळवळकर
3) उत्तेजनार्थ सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
4) अभिनेता प्रथम क्रमांक तेजस मस्के
5) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक तेजस मस्के
6) प्रथम क्रमांक उत्कृष्ट संगीत
7) सर्वोत्कृष्ट रंगभूषा प्रथम क्रमांक
या बक्षीस वितरणना साठी अनेक चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते सर्व मान्यवर कलाकारांकडून कुडाच्या या संघाचे विशेष कौतुक करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =