जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ संजना जुवाटकर यांची अप्रतिम काव्यरचना
गावात तूच माझा, होतास खास मित्रा
शहरात येवुनी तू, दावी मिजास मित्रा
आईस विसरुनी तू, गेला असा कसा रे…
ह्रुदयातला तिच्या तू, होतास श्वास मित्रा
शेतात राबणाऱे, बघ आठवून बाबा
घामातल्या सुखाचा, गिळलास घास मित्रा
ना अंथरूण बघता, पसरीत पाय गेला
मोहात दौलतीचा, केलास ऱ्हास मित्रा
नाती दुरावल्याने, संसार फाटला रे
व्यसना अधीन होता, गेला लयास मित्रा
होतास काय तेव्हा, झालास काय आता
पाहून रे तुला मी, झालो उदास मित्रा
सांगू कसे कुणा मी, होतास मित्र माझा
दे सोडुनी अता तू, या मृगजळास मित्रा
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.