You are currently viewing अंकुर

अंकुर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

काल् एक अंकुरले बीज पाहिले
रम्य नव्या पहाटेस जीवन स्फुरले

वाट पाहिली असेल
दिन अनेक मातीत
अंधार भोगला असेल
उन पावसा सहीत्
मिटू पाहता अखेर अंकुर त्या फुटले
काल एक अंकुरले बीज पाहिले

सुंदरशी अनुभूती जरी
प्रश्न उगा मनी रुजले
असेल काय हेच सत्य
रहस्य जन्म जन्मातले
मिटता “मी “बीज द्वार मुक्तीचे खुलले
काल एक अंकुरले बीज पाहिले

बहर सम्पता क्षणीच
रोप ही कॉमेजते ना ?
फिरूंनी वसंत ये दारी
तेच गन्ध फुलविते ना ?
मनुष्य काय वेगळा मग सहजच सुचले
काल एक अंकुरले बीज पाहिले

अरविंद
२३/१/२२

प्रतिक्रिया व्यक्त करा