कोवीडच्या काळात मुंबईस्थित डाॅ. दिलीप रामदास पवार यांनी विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिव्हील हाॅस्पीटल , आरोग्य केंद्र , नगरपरिषदा तसेच ग्रामपंचायत व विविध सामाजिक संस्थाना ५००० पी.पी.ई.कीट , शेकडो ऑक्सीमीटर , हजारो मास्क , सॅनीटरायझर इत्यादी वस्तू मुबलक प्रमाणात दिल्या . तसेच मुंबईच्या ठिकाणी जर रुग्णांना मदत हवी असल्यास मदतही पुरवली .
कोरोना काळातील त्यांच्या अद्वीतीय कार्याची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन कोरोना वाॅरीयर अवार्ड २०२० , टाईम्स ऑफ इंडिया कोरोना वाॅरीयर अवार्ड २०२० , इंडियन रेड क्राॅस सोसायटी वाॅरीयर अवार्ड २०२० , मुंबई महानगरपालिका , इंडिया टुडे अशा नामांकित संस्थांनी त्यांचा ” कोरोना योद्धा ” म्हणून गौरव केला .
त्यांनी केलेले कार्य लक्षात घेता त्यांच्या सेवाभावीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना शाल व सन्मानपत्र देऊन नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , ता.चिटनीस जयंत मोंडकर , अॅड. सुषमा खानोलकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , वृंदा मोर्डेकर , रसीका मठकर , ओंकार चव्हाण तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .