देवगड
देवगड बंदरात उभ्या असलेल्या सोनू गणपत चौगुले यांच्या मालकीच्या विद्यागणपतप्रसाद या नौकेवरील सुमारे २० हजार रूपये qकमतीची जीपीएस् व वायरलेस यंत्रणा चोरून नेल्याचे २९ जानेवारी रोजी निदर्शनास आले असून नौकामालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सोनू गणपत चौगुले (रा.देवगड सुमतीनगर)यांच्या मालकीची विद्यागणपतप्रसाद ही मच्छिमारी नौका देवगड बंदरात उभी होती.२८ जानेवारी सायंकाळी ४ ते २९ जानेवारी सकाळी ९वा.कालावधीत नौकेच्या केबीनमध्ये बसविण्यात आलेली जीपीएस व वायरलेस यंत्रणा कोणीतरी चोरून नेल्याचे चौगुले यांच्या निदर्शनास आले.त्यांनी याबाबत तांडेल व खलाशी यांना विचारले मात्र त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.
नौकेवर चौगुले यांनी ९ हजार रूपये qकमतीची जीपीएस् यंत्रणा व १० हजार रूपये qकमतीची वायरलेस यंत्रणा बसविली होती.ती चोरून नेल्याची तक्रार चौगुले यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.