बांदा
बालसंस्कार समुह महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळावा यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर व दुर्वा दत्ताराम नाटेकर या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय सुयश मिळवले असून त्यांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
बालसंस्कार समुह हा महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षक स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम आॅनलाईन स्पर्धात्मक स्वरूपात घेत असून या समुहाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात.
बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी आॅनलाईन श्लोक पाठांतर स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,सरपंच अक्रम खान ,विस्तार अधिकारी दूर्वा साळगावकर ,केद्रप्रमुख संदीप गवस ,मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन मिळाले.