मळगाव ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग व ग्राम निधीत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आयुक्त पातळीवर चौकशी केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ग्रामस्थांना दिली. मळगाव ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्यासमवेत मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेतली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आना गावकर आनंद देवळी रत्नमाला तळकटकर तुकाराम सावंत सारिका राऊळ, ग्रामस्थ मनोहरराव भालचंद्र सावंत, विनायक सावंत, काका गावकर, दीपक देवळी, गुरुनाथ गावकर आदी उपस्थित होते.
मळगाव ग्रामपंचायतीमध्ये फेब्रुवारी 2021 ते डिसेंबर 2019 च्या कालावधीत विकास कामाच्या नावाने ग्राम निधी खर्च करताना सदस्यांना विचारात न घेता मासिक सभेत चर्चा न करता ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी पद्धतीने खर्च केला यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा पातळीवर दाद मागूनही ज्ञाना मिळत असल्याने 26 जानेवारी रोजी ग्रामस्थ तसेच शिवसेनेच्या ग्रा.प सदस्यांनी उपोषण छेडले होते.
यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली होती यावेळी झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी समिती नेमण्यात येईल तसेच आयुक्त मार्फत चौकशी लावू असे आश्वासन दिले होते.
याच पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थ तसेच सदस्यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या मार्फत आज कागल कोल्हापूर येथे भेट घेत आलेल्या भ्रष्टाचाराबाबत लक्ष वेधले तसेच आयुक्त मार्फत चौकशीची मागणी केली मंत्री मुश्रीफ यांनीही याबाबत तात्काळ संबंधित यंत्रणेला सूचना करतो असे