वैश्यवाडा येथील महिला उद्योग केंद्रात “सिंधुरत्न समृद्ध” योजनेचा शुभारंभ…
सावंतवाडी
शहरातील बंद असलेले प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी आता महिलांनी पुढाकर घ्यावा,असे आवाहन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान महिलांसाठी विविध योजना राबविताना त्यासाठी लागणारा निधी आम्ही देऊ, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. महिला उद्योग केंद्र वैश्यवाडा येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचा शुभारंभ श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, महाकॉयर समूह समन्वयक शंकर सावंत, कॉनबॅक बांबू फॅक्टरीचे मोहन होडावडेकर, कोकण कृषी विद्यापीठ वेंगुर्ला बळवंत सावंत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो,भारती मोरे,दिपाली सावंत, नगरषरिदेचे श्री. भोसले, महिला बचतगटांचे प्रतिनिधी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या पार्श्वभूमीवर नगरषरिद व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांना सक्षम व शाश्वत रोजगार’ उपलब्ध करण्यासाठी महिला बचत गटांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राच आयोजन करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री गृह, वित्त व नियोजन केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘सेतू महिला शक्तिचा, मार्ग स्वावलंबनाचा’ हे ब्रीद घेऊन ह्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या चर्चासत्रात शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. ४ टप्प्यात शहरातील शेकडो महिलांना स्वावलंबच मार्गदर्शन करण्यात आले.