You are currently viewing बांदा ग्रामपंचायततर्फे बचत गटांना शिलाई मशीन वाटप

बांदा ग्रामपंचायततर्फे बचत गटांना शिलाई मशीन वाटप

बांदा

महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यांचे सक्षमीकरण करण्याकरिता बांदा ग्रामपंचायतने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार ‘सबका साथ सबका विकास’ आम्ही करतो. गावातील समूह बचत गटांना शिलाई मशीन वाटप करून बांद्यातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ यांनी केले.

बांदा येथे आयोजित 14व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत तर्फे तब्बल 57 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. राऊळ बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, मकरंद तोरसकर, राजेश विरनोडकर, श्याम मांजरेकर, अंकिता देसाई, समीक्षा सावंत, रिया अलमेडा, बाळू सावंत, शिलाई मशीन दुकानदार अभय देसाई, तसेच ग्रा. पं. कर्मचारी अनुजा देसाई, संजय सावंत, सोनाली पाटील, सफाई कामगार रामा पाटील, लखन पाटील, संदीप लाखे, भारत लाखे, संदीप वसकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा