पणदूर:
३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता कुडाळ तालुक्यात पणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दिव्यांग व्यक्तींचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अस्थिरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, नेत्र चिकित्सा अधिकारी हे उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची तपासणी करणार आहेत.
यावेळी पणदूर तालुका कुडाळ पंचक्रोशीतील दिव्यांग व्यक्ती ज्यांनी कुठल्याही प्रकाराने अपंगत्व प्रमाणपत्र घेतलेले नाही. तसेच ज्यांचे प्रमाणपत्र २०१२ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेतलेले आहे, अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे. सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो (अस्थिव्यंग व्यक्तींनी ४ बाय ६ अकारातील फोटो) तसेच आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.