*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी यांनी लावणी रचना
तुम्हा पाहूनच बगा घोंगडं टाकलं
पावन रातच्याला केलं भाकर पिठलं l
तिखट खान्देशी मिरची शेतावरची
लसणीची चटणी ह्या गरिबा घरची
नव्या कांद्यानं डोळ्यात पाणी आणलं
पावन रातच्याला केलं भाकर पिठलं l
आंब्याच लोणचं वाढलं पहा ताटात
चवीला रुचकर पापड ठेवला भाजत
जाड भाकरीवर घरच लोणी वाढलं
पावन रातच्याला केलं भाकर पिठलं l
डाळ भिजलेली वाटली पाट्यावर
झुणका खमंग फोडणीचा तव्यावर
हळू हळू खावा इतक्यात कसं उरकलं
पावन रातच्याला केलं भाकर पिठलं l
विलास कुलकर्णी
मीरा रोड
२८.१.२०२२