दोडामार्ग सर्वसाधारण पुरुष; तर वैभववाडी, देवगड सर्वसाधारण महिला..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज मुंबई मंत्रालयात पार पडले. यात कुडाळ सर्वसाधारण महिला, देवगड सर्वसाधारण महिला, वैभववाडी सर्वसाधारण महिला, दोडामार्ग सर्वसाधारण पुरुष या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. आता दोडामार्ग मध्ये संतोष नानचे की चेतन चव्हाण की राजेश प्रसादी हे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. तर काही ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.