You are currently viewing निवती समुद्रात मासेमारी करताना बोटीवरून पडून खलाशाचा बुडून मृत्यू

निवती समुद्रात मासेमारी करताना बोटीवरून पडून खलाशाचा बुडून मृत्यू

निवती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद

वेंगुर्ले :

निवती बंदर समोर खोल समुद्रात मासेमारी करताना वाऱ्यामुळे तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडून मासेमारी बोटीवरील एका खलाशाचा मृत्यू झाला. सद्या मेढा येथे राहणार आणि मूळ कारवार जिल्यातील गाबीतवाडा – माजियाळी येथील रहिवासी सूरज तुकाराम कुर्ले वय 31 वर्ष असे त्याचे नाव आहे.

मालवण तालुक्यातील मेढा राजकोट येथील सहदेव निळकंठ बापार्डेकर यांनी पोलिसात दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, सुरज कुर्ले हा नेहमीप्रमाणे आज २६ जानेवारी रोजी मासेमारी करण्यासाठी बोटीवर चढला. निवती बंदर समोर खोल समुद्रात आपले सहकारी यांचेसोबत मासेमारी जाळी समुद्रात टाकत असताना वाऱ्यामुळे सुरज कुर्ले याचा तोल जाऊन तो समुद्राच्या पाण्यात पडला. काही क्षणात त्याच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी पाण्यात उतरून समद्राच्या पाण्यातून त्याला वर बोटीवर काढले. मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता.

त्यास उपचाराकरिता तत्काळ किनाऱ्यावर बोट आणून उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या बाबत माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक जी. व्ही. वारंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो. हवालदर श्री. भांगरे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा