You are currently viewing भात खरेदी नोंदणीस 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

भात खरेदी नोंदणीस 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन 2021-22 हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी 1 हजार 940 रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी 31 जानेवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप धान खरेदी केंद्रावर नोंदमी केलेली नाही त्यांनी त्वरीत तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन ए.एस. देसाई, जिल्हा मार्केंटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा