कुडाळ :
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मनाली शिवराम कद्रेकर (ए.एन.एम)प्रथम, सायली गुरुनाथ म्हाडगुत(बी.एड.) द्वितीय,तर श्रेया उमाकांत नाईक(इ.१०वी सीबीएसई) ,तृतीय क्रमांक मिळवत यशस्वी झाले. उत्तेजनार्थ म्हणून रेवती राजाराम नाईक( फिजियोथेरेपी महाविद्यालय )आदित्री भारतेंदु आवळे (इ.चौथी ,सेंट्रल स्कूल), कविता मुरारीलाल सैनी( दहावी सीबीएसई) अनुष्का अरुण तेरसे (सातवी, सीबीएसई) यांना गौरविण्यात आले परीक्षक म्हणून प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रा. वैशाली ओटवणे, प्रा.शुभांगी लोकरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मार्गदर्शन अरुण मर्गज यांनी डॉ.सुरज शुक्ला यांनी मार्गदर्शन करताना “घटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा योग्य वापर करा. व आपली बुद्धी, नीतिमत्ता आणि देशाप्रति निष्ठा यांचा मान ठेवून योग्य उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे. असे आवाहन केले. आणि प्रथम आपण १८ वर्षे पूर्ण झाले असाल तर मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून बहुमूल्य मतदानाचा हक्क याचे हक्कदार व्हा .असे आवाहन केले. उपस्थितांत तर्फे *मतदानाचा हक्क बजावत असताना जात ,धर्म ,पंथ, वंश, भाषा, समाज यांच्या प्रभावाखाली न येता देशाच्या लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाही परंपरेचे जतन करून मुक्त व नि:पक्षपाती ,निर्भय व शांततापूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावू* अशी उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली . यावेळी व्यासपीठावर प्रा .अरुण मर्गज प्रा .कल्पना भंडारी ,प्रा .शुभांगी लोकरे, प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रा. वैशाली ओटवणेकर ,डॉ. प्रगती शेटकर उपस्थित होते.