वृत्तसेवा :
दुध अनुदान योजनेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सरकारने २५ कोटी ८९ लाख ४१ हजार ५९९ रुपये वितरीत करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये दुध अनुदान योजना जाहीर केली होती. त्यातून पिशवीबंद दूध वगळून गाई दुधाच्या रुपांतरणसाठी पाच रुपये व तीन रुपये प्रतिलिटरला अनुदान देण्यात येते.
दुध अनुदान योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या अनुदानासाठी वित्त विभागाने पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या 25 कोटी 89 लाख 41 हजार 599 रुपयाच्या वितरणासाठी कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाला मंजुरी दिली आहे. दूध व दूध बुकटीसाठी अनुदान, अतिरिक्त दुधाचे रूपांतर व निर्यात करण्यासाठी सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. हे अनुदान देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.
सरकार निर्णयानुसार राज्यातील दूध बुकटी व रुपांतरीत दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध बुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद वगळून उर्वरित गाई दुधाच्या प्रकल्पांना अनुदान देण्यात येते. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने एक बैठक घेतली होती.