तिसऱ्या दिवशी कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणेंची हजेरी
तपासी अधिकारी उपस्थित नसल्याने गेले माघारी..
कणकवली
सिंधुदुर्ग पोलिसांनी आपल्याला बजावलेल्या नोटिसा नुसार दिनांक २४ पासून ते २७ जानेवारीपर्यंत मी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावत आहे. जो काही गुन्हा आहे, त्यासंदर्भात तपासी अधिकाऱ्यांना मी सर्वतोपरी सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.पोलीस स्थानकात हजर राहून पोलिसांना पहिल्या दिवशी पासून मी सहकार्य करत आहे.काही जी चौकशी करत आहेत,त्याला माझे सहकार्य आहे,असेही राणे यांनी सांगितले.
दरम्यान,१६ जानेवारी रोजी सकाळी सकाळी ११.४० वाजताच्या दरम्यान कणकवली पोलीस स्थानकात आ.नितेश राणे हजर झाले. यावेळी तपासी अधिकारी उपलब्ध नसल्याने ते १२ वाजता परत गेले आहेत.यावेळी वकील संग्राम देसाई उपस्थित नव्हते.