वाचनाशिवाय व्यक्तिमत्त्व प्रभावी होऊच शकत नाही:- संजय वेतुरेकर
तळेरे : प्रतिनिधी
अॅड. अभय देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय डिगस तर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2022 रोजी चित्रकला स्पर्धा आणि 22 जानेवारी 2022 रोजी निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या दोन्ही स्पर्धाना डिगस मधून उदंड प्रतिसाद मिळाला असून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डिगस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक आळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
*यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-*
1) *चित्रकला स्पर्धा*
विषय : *सावित्रीबाई फुले*
प्रथम क्रमांक .. गणपत दत्तराम पवार
द्वितीय क्रमांक..दीपेश दिनेश सावंत
तृतीय क्रमांक..सानिया अमित मेस्त्री
उत्तेजनार्थ
1.सदाशिव प्रकाश सावंत
2.नीलम संतोष पवार
2) *निबंध स्पर्धा*
विषय: *आजच्या युगात ग्रंथालयांची आवश्यकता.*
प्रथम क्रमांक..कु.सानिया अमित मेस्त्री
द्वितीय..कौशल संतोष चेऊलकर
तृतीय..प्रियांका पुंडलिक पवार
उत्तेजनार्थ
1. गौरी पुरुषोत्तम कुबल
2.वामन दशरथ मेस्त्री
यावेळी दोन्ही स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक यांना प्रत्येकी रुपये 201 रुपये 151 रुपये 101 व उत्तेजनार्थ रुपये 51 आणि प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे श आळवे सर म्हणाले शासनाचे तुटपुंजे अनुदान यावर आज जिल्ह्यातील वाचनालये सुरू आहेत वाचक वर्ग कमी होत चाललेला असून ही चिंतेची बाब आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय वेतुरेकर म्हणाले वाचनाशिवाय आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी होऊच शकत नाही मोबाईल आणि संगणकाच्या या काळात वाचनालये आणि वाचक यांचे प्रमाण वाढले पाहिजे त्यासाठी शासनाने कर्मचार्यांना किमान वेतनाची सोय केली पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. पूजा वेतुरेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी श्री अशोक राणे,रमेश कांबळे,अनुजा सावंत,साक्षी वंजारी,श्री दीपक कदम,कु.प्राजक्ता कदम प्रदीप वेतुरेकर व इतर वाचक विद्यार्थी उपस्थित होते शेवटी श्री रमेश कांबळे यांनी आभार मानले.
अॅड. अभय देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय डिगस आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मान्यवर