You are currently viewing नापणे धबधबा रस्त्याचे काम आज 26 जानेवारीपासून सुरू करण्याची लेखी हमी ठेकेदार यांनी दिल्यामुळे नापणे गावातील ग्रामस्थांनी 26 जानेवारी करत असलेले उपोषण तूर्तास स्थगित ….

नापणे धबधबा रस्त्याचे काम आज 26 जानेवारीपासून सुरू करण्याची लेखी हमी ठेकेदार यांनी दिल्यामुळे नापणे गावातील ग्रामस्थांनी 26 जानेवारी करत असलेले उपोषण तूर्तास स्थगित ….

वैभववाडी
नापणे धबधबा रस्त्याचे काम आज 26 जानेवारीपासून सुरू करण्याची लेखी हमी ठेकेदार यांनी दिल्यामुळे नापणे गावातील ग्रामस्थांनी उद्या चे उपोषण स्थगित करण्यात आले आहे आज याबाबत नापणे गावात अधिकारी ग्रामस्थ आणि ठेकेदार याच्यात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नापणे गावातील ग्रामस्थांच्या एकटीमुळेच हे शक्य झाले आहे नापणे धबधबा रस्ता चे गेले 3 वर्ष काम रखडले होते.संबधीत ठेकेदार आणि मुख्यमंञी सडक योजनेचे अधिकारी यांच्याशी अनेक वेळा पञ व्यवहार करूनही काम सुरू केले नाही म्हणून 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता .आज पोलिस निरीक्षक अतुल यांनी संबंधित खात्याचे खाते प्रमुख आणि ठेकेदार नापणे गावातील ग्रामस्थांशी चर्चा आले होते यावेळी ग्रामस्थांनी काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भुमिका घेतली 26 जानेवारीपासून काम सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले तसेच एक महिन्यात काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यामुळेच प्रजासत्ताक दिनी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी यशस्वी मध्यस्थी केली
यावेळी सरपंच जयप्रकाश यादव, दता काटे , संदीप सरवणकर, प्रकाश यादव, नारायण गुरव ,चंद्रकांत बोडेकर, किशोर जैतापकर, समाधान काडगे,राजराम लाड,विनोद जठार, यशवंत जैतापकर, दत्ताराम खाडेकर,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा