महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत नामदार उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांना निवेदन दशरथ शिंगारे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिले .निवेदनामध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा समावेश होता .त्यामध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ पूर्वीप्रमाणे देण्यात याव्यात . कायमस्वरूपी ओळख पत्र देण्यात यावे .वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये संवर्ग -१ मध्ये समावेश करण्यात यावा . शासन आदेशानुसार राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी ,शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नती देण्यात यावी .राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एस टी व रेल्वे प्रवास सवलत मोफत देण्यात यावी . शासनाच्या विविध समित्यांवर राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सेवाजेष्ठता प्रमाणे सदस्यत्व द्यावे .सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती मध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रतिनिधित्व द्यावे .अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्य संघटनेच्यावतीने देण्यात आले .माननीय मंत्री महोदयांनी संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व चर्चेमध्ये आपल्या मागण्या शालेय शिक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळे आपल्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या विभागाकडे या मागण्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील . आपले निवेदन शालेय शिक्षण विभागाकडे पाठवले जाईल ,अशा प्रकारचे आश्वासन दिले . या भेटीप्रसंगी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष -शिवराज सावंत, सरचिटणीस -संदीप शिंदे, मार्गदर्शक सल्लागार – विजय भोगले ,मुख्य संघटक – विठ्ठल कदम ,कोषाध्यक्ष – उदय गोसावी आदी उपस्थित होते .
नामदार उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना व राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना महाराष्ट्र राज्यकार्याध्यक्ष -दशरथ शिंगारे .व उपस्थित संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी .