You are currently viewing शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज भरणयाची मुदत 31 जानेवारी पर्यंत

शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज भरणयाची मुदत 31 जानेवारी पर्यंत

सिंधुदुर्गनगरी

अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरिता असलेल्या शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता योजनांचा लाभ धेण्यासाठी विद्यार्थ्यींनी महाडीबीटी पोर्टलवर दि. 31 जानेवारी 2022 रोजीपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

          तसेच महाविद्यालयातील प्राचाऱ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील मागासावर्गीय विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप अर्ज नोंदणी व नुतनीकरण दि. 31 जानेवारी 2022 पूर्वी  करण्याबाबात तात्काळ कार्यवाही करावी. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी व नुतनीकरण करून तसेच अर्जाची छाननी करून अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करणेबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा