प्रसाद पारकर, दीपक बेलवलकर यांची माहिती; ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम होणार…
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ ३४ वा व्यापारी एकता मेळावा कणकवलीत ३१ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोना काळातील महामारीमुळे नियमानुसार सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पध्दतीने हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे, चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी, सभापती मनोज रावराणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, सुनील सौदागर, मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर, गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई, विनय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली.