You are currently viewing डोळ्यांमधून माझ्या….

डोळ्यांमधून माझ्या….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी लेखक अनिलजी देशपांडे यांची अप्रतिम काव्यरचना

दु:खे जटील सरता, हर्षांत नाहविति;
डोळ्यांमधून माझ्या, निखळून अश्रु जाति IIधृII

हा हर्ष आवरे ना, का दु:ख विस्मृती ही?
पेचात या अनोख्या, मज टाकुनीच जाति II१II

त्या कालच्या स्मृतिंना, का आज हा उजाळा?
वा उद्या हेच गाणे, आताच जाण देति II२II

आता कधी न येणे, छळण्या तुला पुन्हा बा;
वचने नव्या उषेच्या, साक्षीत रात्री देति II३II

©अनिल देशपांडे®, मुंबई.
09830463908

प्रतिक्रिया व्यक्त करा