निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.
*प्रश्न १९ :- कृतज्ञता हेच पुण्य व कृतघ्नता हे पाप हा जीवनविद्येचा सिध्दांत स्पष्ट कराल का ?*
*उत्तर :-* *… क्रमशः पुढे ..*
वास्तविक , ज्या देवाने आपल्याला हे सुंदर मानवी शरीर जीवनाचा व्यापार करुन परमानंदाचा फायदा उठविण्यासाठी दिले , त्या देवाबद्दल आपल्याला अत्यंत कृतज्ञता वाटणे हे परमकर्तव्य होय . या अपेक्षेत खालील मराठी सुभाषित लक्षात ठेवल्यासारखे आहे .
*डोळ्यांनी बघतो , ध्वनी परिसतो कानी , पदी चालतो ।*
*जिव्हेने रस चाखितो , मधुरही वाचे आम्ही बोलतो ।*
*हातांनी बहुसाळ काम करिसी , विश्रांती ही घ्यावया ।*
*घेतो झोप सुखे , फिरुनी उठतो ही ईश्वराची दया ।*
अशी कृतज्ञता न वाटणे हेच फार मोठे पाप आहे . याच्या उलट अशी कृतज्ञता अगदी मनापासून वाटणे हे फार मोठे होय .
हे पुण्य फार मोठ्या प्रमाणात ईश्वरी बँकेत जमा होते व ते आपल्याला आपल्या जीवनात नाना रुपाने अंतर्मनाच्याद्वारे सहाय्य करते . या अपेक्षेत डाॕ . मर्फी यांचे खालील उदगार चिंतनीय आहेत .
*A greatful heart is always close to the creative forces of the universe causing countless bleessings to flow towards it by the law of reciprocal relationship based on the cosmic law of action and reaction .*
देवाबद्दलच्या कृतज्ञतेने भरुन व भारुन गेलेले मानवाचे अंतःकरण म्हणजे त्या भगवंताचे सिंहासन असून त्या सिंहासनावर विराजमान झालेल्या त्या प्रभुकडून त्याच्या भक्तावर निसर्गनियमांना अनुसरुन कृपेची बरसात होते .
ईश्वरस्मरणात देवाबद्दलची कृतज्ञता सहजच अभिप्रेत आहे . म्हणून ईश्वरस्मरणात अगणित पुण्य संचय करण्याचे अतुल सामर्थ्य आहे . थोडक्यात सांगायचे म्हणजे ईश्वरस्मरण म्हणजे साक्षात् पुण्याची खाणच आहे .
*— सदगुरु श्री वामनराव पै .*