You are currently viewing संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात  चौकशी

संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात  चौकशी

कणकवली

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी चौकशी करिता आमदार नितेश राणे हे आज कणकवली पोलिस स्टेशनला उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत ॲड. संग्राम देसाई हे देखील उपस्थित होते. पोलिसांनी राणे यांची पाऊण तास चौकशी केली.

शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याचा पर्याय श्री राणे यांच्यासमोर आहे. तसेच २७ जानेवारीपर्यंत आमदार नितेश राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सरकार पक्षाच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या सर्व प्रकरणी पोलिसांकडून तपास काम सुरू असताना आज सुमारे पाऊण तास आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस स्टेशनला चौकशी करता उपस्थित राहिल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा