You are currently viewing घाटकोपर मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न..

घाटकोपर मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न..

मुंबई
लक्ष फाउंडेशनच्या वतीने घाटकोपर मधील असल्फा व्हिलेज येथील नलिया भानुशाली हॉलमध्ये शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक राजेंद्र पाखरे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरांमध्ये मुंबई सीमा शुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी स्पर्धा परीक्षेसाठीची शैक्षणिक अहर्ता, नोकरीच्या संधी, परीक्षा देताना अभ्यासपूर्ण तयारी इत्यादींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद साडविलकर, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे निदेशक यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत साळेकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा