जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका, कवयित्री श्रद्धा सिंह यांची मुक्तछंद काव्यरचना
नंदनवन मी कृष्ण राधिका। ब्रजवासी मी गोपगोपिका।।
उत्तर मी अन् प्रश्न मीच जरि, सघन असा घनमूळ मी परि।
घात लावूनिया शून्याचा, बाकी उरला तो एक मी
अचूक वा कच्चे तरि, करी गणित कोणी मांडेल का?
दुरुन पहावे उघडे डोंगर, जे स्पर्धी उतरती नभासवे
सांधती अंतर थेट आकाशी, पोकळीत ही मीच उरावे
पान फूल अन् पक्षी मक्षिका, गंध रस मी मधु भक्षिका !
अनंत काळ युगचक्र गतीमध्ये, मी क्षण निमिष वेळ अन् घटिका।
विफल फल तरि कर्तव्य असे, नियमित कारक मी करविता।
आकाशी स्थिर चंद्र दिर्घिका, हा उगम कोणी शोधेल का?
रचनाकार: सौ. श्रद्धा दीपक सिंग , पुणे
8805203352