निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते कसं टाळायचं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.
*प्रश्न १९ :- कृतज्ञता हेच पुण्य व कृतघ्नता हे पाप हा जीवनविद्येचा सिध्दांत स्पष्ट कराल का ?*
*उत्तर :- *… क्रमशः पुढे…*
देवाने हे शरीर आपल्याला भांडवल म्हणून दिले आहे ते केवळ जीवनाचा व्यापार करुन सर्वसुखाचा फायदा करुन घेण्यासाठी होय .
एका बापाने आपल्या तीन मुलांना प्रत्येकी पांच हजार रुपये व्यापार करण्यासाठी भांडवल म्हणून दिले व तो काशी यात्रेला निघून गेला . त्याचा हेतू असा की , आपल्या मुलांनी उत्तम व्यापार करुन खूप नफा मिळवावा व स्वतःचे कल्याण साधावे .
त्यांंच्यापैकी एका मुलाने मोठा व्यापार करुन पांच वर्षात पांच हजारांचे पांच लाख रुपये केले .
दुसऱ्याने कांहीही व्यापार न करता ते पैसे तसेच गुप्त ठिकाणी लपून ठेवले . परिणामी पांच हजार रुपयांच्या रकमेत वाढही झाली नाही व घटही झाली नाही .
तिसऱ्या मुलाने मटका , जुगार , रेस व दारु यासाठी ते सर्व पैसे खर्च करुन तो कफल्लक झाला . आपली अवस्था अशीच झाली आहे .
मानवी शरीर हे अमोल भांडवल देवाने आपल्याला दिले आहे व त्याने त्या भांडवलाचा उपयोग करण्यासाठी बुध्दी व कर्म करण्याचे पूर्ण स्वातंत्र्यही मानवाला दिलेले आहे .
या स्वातंत्र्याचा व भांडवलाचा उपयोग करुन मानवाचे देव व्हावयाचे की दानव व्हावयाचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते अन्य कोणीही नाही .
*(.. क्रमशः …)*
*– सदगुरु श्री वामनराव पै .*