You are currently viewing चांदणी रात

चांदणी रात

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची साकव्य लावणी स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त लावणी रचना

चारचौघात राया तुमची शिट्टी वाजली
अन गालावर लाली तवा शरमेनं लाजली !!धृ!!

गुलकंदावानी झाले ओठ माझे लाल
तुमच्या इष्कात खुलले गोरे गोरे गाल
नाचता नाचता नाकातली नथ सांडली
अन गालावर लाली तवा शरमेनं लाजली !!

नका पाहू राया अशी तुम्ही रोखून नजर
ध्यान भलतीकडं जाऊन सरकेल पदर
हात हाती घेता माझी काया भिजली
अन गालावर लाली तवा शरमेनं लाजली !!

गार गार वारा सुटलाय कसा माझ्या मनी
भलं भलं सुचतंय राया तुमच्या ध्यानीमनी
जरा इचार बदलून भेटा रात चांदणं न्हाली
अन गालावर लाली तवा शरमेनं लाजली !!

©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
०१/०१/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा