You are currently viewing अभय दाभोलकर यांचा मृतदेह मिळाला खाडी किनारी

अभय दाभोलकर यांचा मृतदेह मिळाला खाडी किनारी

वेंगुर्ले पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद

वेंगुर्ले

तालुक्यातील दाभोली राजापूरकरवाडी येथील रहिवासी अभय लक्ष्मण दाभोलकर (वय ४९) यांचा मृतदेह आज शुक्रवारी दुपारी २ ते ४ वा.च्या सुमारास नजीकच्या ताटाच्या खाडीच्या ठिकाणी आढळून आला.याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची खबर त्यांचा भाऊ अमित लक्ष्मण दाभोलकर यांनी पोलिसात दिली आहे.अभय यास ताटाच्या खाडीच्या ठिकाणी शौचास जाण्याची सवय होती.आज दुपारी त्याच्या पत्नीने पाहिले असता माडातून खाली समुद्राच्या खाडीत पडलेला आढळला.त्यांनी आरडाओरडा केल्यावर पाहिले असता ते खाडीत पडल्याचे आढळून आले.त्यास फीट येण्याची सवय असल्याने बुडून मयत झाला असावा,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिस उपनिरीक्षक व्ही.ए. केसरकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.यावेळी सरपंच उदय गोवेकर, पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर, अमित दाभोलकर,दाजी राजापूरकर, देवेंद्र राऊळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.पंचनामा केल्यानंतर मृतदेह वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या संदेश निकम मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेने वेंगुर्ले येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.उशिरा सायंकाळी ७ वा. सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याबाबत अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बी.जी. चव्हाण हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा