गटनेतेपदी संजय सावंत यांची निवड
वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला 17 पैकी 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतवर सत्ता भाजपचीच आली आहे. तरीही भाजपाने एकूण दहा सदस्यांचा गट स्थापन केला आहे. गटाची रीतसर नोंदणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजपाचे नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष (भाजपा पुरस्कृत) अशा दहा जणांचा गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक संजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा वाभवे – वैभववाडी नगर विकास आघाडी या नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. गट स्थापन झाल्याचे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी यांनी गटाकडे सुपूर्द केले आहे
गटातील सदस्य पुढीलप्रमाणे गटनेता संजय सावंत, सदस्य विवेक रावराणे, रोहन रावराणे, राजन तांबे, संगीता चव्हाण, यामिनी वळवी, नेहा माईणकर, सुंदरी निकम, सुप्रिया तांबे, रेवा बावदाने यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे उपस्थित होते.