वेंगुर्ले
ग्रामीण रुग्णालय व आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात तब्बल सात वर्षांनी प्रसुती विभाग सुरू झाला आहे. या विभागाच्या डाॅ.स्वप्नाली माने-पवार यांचे भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
पुर्वाश्रमीचे वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय व आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात गेली कित्येक वर्षे महिला प्रसुती तज्ञ नसल्याने प्रसुती विभागच बंद स्थितीत होता. परंतु दोन महिन्यापूर्वी महिला डाॅक्टर स्वप्नाली माने – पवार यांची शासनाने उस्मानाबाद येथुन बदली करून वेंगुर्ले येथे नेमणूक केल्यामुळे गरोदर महीलांची तपासणी सुरू झाली व तब्बल सात वर्षांनी वेंगुर्लेत प्रसुती विभाग सुरू झाला व त्यामुळे गोर गरीब महीलांची अडचण दुर झाली आहे.
डाॅ . माने-पवार नुकतीच एका गरोदर महिलेची नाॅर्मल प्रसुती केली व वेंगुर्ले रुग्णालयातील प्रसुती विभाग पुन्हा एकदा सुरू केला. त्याबद्दल त्यांचे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु. शितल आंगचेकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका कृपा मोंडकर, रसीका मठकर इत्यादी उपस्थित होत्या.