You are currently viewing धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?

धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?

उत्तर : (क्रमशः)

जीवन जगत असताना माणसाच्या हातून कर्म घडत असते. या कर्माच्या , सत्कर्म व दुष्कर्म अशा दोन जाती असतात.

सत्कर्मातून पुण्य निर्माण होत असते व दुष्कर्मातून पाप निर्माण होते. पाप-पुण्य कसे निर्माण होते हे समजावून घेणे आवश्यक आहे.

सत्कर्म किंवा दुष्कर्म केले की ते त्वरीत फळाला येतेच असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने कोणाला तरी शिवी हासडली तर तो माणूस तात्काळ शिवी देणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढतो. येथे कर्माचे फळ तात्काळ मिळाले.

आता दुसरे उदाहरण पाहू. एका माणसाने आॕफीसमध्ये पैशाची फार मोठी अफरातफर केली आणि पळून गेला. आठ वर्षांनी पोलिसांनी त्याला पकडले व त्याला शिक्षा झाली. येथे फळ मिळायला विलंब झाला.

सर्वसाधारणपणे सत्कर्माच्या बाबतीत प्रकार जरा वेगळा आहे. माणसाने सत्कर्म केले तर बहुधा त्वरीत फळ मिळत नाही, पण उशीरा का होईना फळ हे मिळतेच.

इमारत पाडायला वेळ लागत नाही पण उभारायला मात्र वेळ लागतो. बहुतांशी तसाच प्रकार सत्कर्माचा आहे. असो.

सत्कर्म आणि दुष्कर्म फळाला येण्यापुर्वी मधल्या काळात ते जाणीवेच्या खोल कप्यात दबा धरुन बसलेले असते व फळाला येण्यासाठी अनुकूल संधीची वाट पहाते.

*जाणीवेच्या खोल कप्यात दबा धरुन बसलेले व फळण्यासाठी वाट पाहणारे सत्कर्म किंवा दुष्कर्म यांनाच पुण्य व पाप असे म्हणतात .*

*अनुकूल परिस्थिती प्राप्त होत गेली की हेच पुण्य – पाप परिपक्व होऊन शुभ किंवा अशुभ नियतीच्या रुपात परिवर्तीत होऊन सुख – दुःखाच्या रुपाने माणसाच्या जीवनात साकार होते .*

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

प्रतिक्रिया व्यक्त करा