कणकवली:
कणकवली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रमेश मिरजकर (47, वागदे – आर्यादुर्गा मंदिर नजीक) यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अडचणीच्या प्रसंगी मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव होता. यामुळे प्रमोद मिरजकर यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता. गेले काही दिवस त्यांच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ स्नेहल मिरजकर असा परिवार आहे. देवगड येथिल शिक्षिका व वागदे च्या माजी ग्रा. प. सदस्य प्राजक्ता मिरजकर यांचे ते पती होत.