*पर्यटन संचानालय(DOT) महाराष्ट्र शासन वतीने राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त २५ जानेवारी ला जलक्रीडा व साहसीक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा व्यावसायिकांनि यांचा लाभ घ्यावा :- श्री विष्णू मोंडकर, जिल्हाध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.*
पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र राज्य व पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग तर्फे राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त २५/०१/२०२२ रोजी सकाळी ११.३० वा हॉटेल चिवला बीच येथे जलक्रीडा व साहसीक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या क्षेत्रातील जिल्ह्यातील व्यवसायिकांनी यांचा लाभ घ्यावा.
सध्यस्थितीत नवीन जेटस्की,बनाना,बंपर,स्पीड बोट,वॉटरस्कुटर ,पॅरॅसिलिंग तसेच स्कुबा डायव्हिंग या जल पर्यटन क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील अन्य साहसीक्रीडा प्रकारातील व्यावसायिकांना आपला चालू किंवा नवीन व्यवसाय नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय अधिकृत नोंदणीकृत नसल्याने वारंवार शासनाच्या दंडास व कार्यवाहीस सामोरे जावे लागत आहे पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने या विषयी मार्ग काढण्याचे ठरविले असून सदर व्यवसायातील व्यावसायिकांना या व्यवसाय नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र व व्यवसाय नोंदणी साठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे यासाठी उपसंचालक श्री हनुमंत हेडे कोकण विभाग प्रमुख व श्री प्रशांत वाणी उपअभियंता पर्यटन संचानालय नवी मुंबई कोकण विभाग हे मार्गदर्शन करणार आहेत.
जलपर्यटन व साहसीक्रीडा प्रकारातील जिल्ह्यातील व्यावसायिकानी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा व आपला व्यवसाय नोंदणी प्रकिया पूर्ण करून घ्यावी अशी विनंती श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे .