कोकण वाईल्ड रेस्क्यू टीमचे स्थानिकांनी मानले आभार…
मालवण
शहरातील सीताई कॉम्प्लेक्स मागील विहिरीत पडलेल्या गाईस कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीमने स्थानिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढले. स्थानिक माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या कार्यतत्परतेमुळे त्या गाईस जीवदान मिळाले. याबाबत स्थानिक नागरिकांनी खोत यांच्यासह टीमचे आभार मानले.
भरड भागातील सीताई कॉम्प्लेक्स मागील एका विहिरीत गाय पडली असल्याचे स्थानिक रहिवाशांना दिसले. रमाकांत अटक यांनी याची माहिती माजी नगरसेवक यतीन खोत यांना देताच श्री. खोत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर घटनास्थळी दाखल झाले. श्री. खोत, शिल्पा खोत यांनी कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीमशी तत्काळ संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पिंगुळी येथून कोकण वाइल्ड लाइफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल गावडे, उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर, संजय कुमार कुपकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वप्निल गोसावी, स्वप्निल परुळेकर, अथर्व कुपकर यांनी येथे येत गायीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
स्थानिक नागरिक महेश कोळगे, दिनेश किडये, दीपेश पवार, दुर्गेश गावकर, पालिका कर्मचारी, तात्या देसाई, निशांत देसाई, कल्पक हळदणकर, आनंद आचरेकर, चंदन जाधव, पप्प्या नाईक, विनोद गोलतकर, अपर्णा नाईक, प्रतीक परब, हर्षद पाटील, हेमंत कांदळकर यांचेही सहकार्य लाभले.