गृहमंत्र्यांनी दखल घेऊन संबंधिवर कारवाई करण्याची केली मागणी!
तळेरे: प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साखरी शहरामधील नाथपंथी डवरी गोसावी(भटक्या -विमुक्त जाती जमातील ताई कै.मोहिनी नितीन जाधव हिच्यावर जो अन्यायकारक व संतापजनक प्रकार झालेला आहे. या संतापजनक घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भटके-विमुक्त हक्क परीषद आणि गोंधळी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करतो असे जिल्हा अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी भावना व्यक्त करीत थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोन करून दखल घेण्याची मागणी केली आहे.
..या आमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे सर्वतोपरीने प्रयत्न होत आहेत आणि ताईला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य प्रशासनावर जबरदस्त दबाव आणून त्या घटनेतील सर्व मारेकरांना शिक्षा दिल्याशिवाय शांत राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.