पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी, सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन
कणकवली
भात खरेदी योजने अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस तसेच भात खरेदीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय व्हावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघ यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. सावंत यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, यावर्षी १५ डिसेंबर पर्यत जिल्ह्यात पाऊस होता. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू होण्यास उशिर झाला आहे. त्यामुळे भात खरेदी करणे शक्य होणार नाही, त्यामुळे मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.