You are currently viewing कशासाठी

कशासाठी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री.रामदास अण्णा यांची अप्रतिम काव्यरचना

माणुसकी जपा जरा।
आता तरी नीट वागा।
एक शुभ्र वस्त्र फक्त।
साडे तीन हात जागा।।

अरे सोड जमाखोरी।
किती घालणार घरी।
टीचभर पोटासाठी।
नको फिरू दारोदारी।।

नको लोभ आणि माज।
नको भविष्याची खंत।
सोड गरीबी पैश्याची।
राहा मनाने श्रीमंत।।

जेंव्हा बदलते वेळ।
माती मोल होत सारं।
मग आठवण येते।
आज बोलतो मी खरं।।

एक दिवस आपली।
मातीच होईल वेड्या।
आपला होऊन जग।
तोड मी पणाच्या बेड्या।।

तुझं माझं माझं तुझं।
टाक मोडुन हा बंड।
माणसाने माणसाला।
कशासाठी द्यावा दंड।।

एक क्षण सुखासाठी।
नको धरू मनी हट्ट।
आपलेपणाचे नाते।
सांभाळून ठेव घट्ट।।

तुझी आणि माझी वेड्या।
होऊन जाईल माती।
मरण्याच्या आधी जरा।
जपून ठेवावी नाती।।

रा. वि. पवार (रामदास आण्णा)
गाव : मासरूळ जि. बुलढाणा
7987786373

प्रतिक्रिया व्यक्त करा